कुडाळ /-
मुंबई-गोवा महामार्गामुळे विस्थापित झालेल्या आणि जि.प. शाळा दुरुस्ती या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर झालेल्या जि.प. प्राथमिक शाळा पणदूर नं.२ च्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ शिक्षण व आरोग्य सभापती सौ.सावी लोके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर, सरपंच दादा साईल, उपसरपंच महादेव उर्फ आबा सावंत, तुळसुली सरपंच नागेश आईर, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, गटशिक्षण अधिकारी सूर्यभान गोडे, ग्रामपंचायत सदस्य शिवराम पणदुरकर, अनघा गोडकर, मयुरी जाधव, ॲड. किरण मोरे, सुविधा सावंत, अंकिता राऊळ, माजी सरपंच शामसुंदर पांडुरंग सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंद्रकांत साईल, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मदन शिरोडकर, ग्रामसेवक सपना गणपत मसगे, केंद्रप्रमुख जुनेश गावित, बूथकमिटी अध्यक्ष दीपक साईल, ग्रामस्थ सत्यवान साईल, सुजन राऊळ, मुख्याध्यापक सुमन कदम, दिपश्री परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजना नाईक,माजी अध्यक्ष स्वप्नाली गोसावी, पालक यशवंत गोसावी, महादेव (बबन ) गोसावी, विभावरी पालव, अंगणवाडी सेविका प्रणया सावंत, मदतनीस दीक्षा साईल, ग्रामपंचायत कर्मचारी कांशीराम साईल, पूनम साईल, दत्तात्रय गोसावी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.