पिंगुळीतील विकासकामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपुजन…

पिंगुळीतील विकासकामांचे आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपुजन…

कुडाळ /-

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पिंगुळी गावात मंजूर झालेल्या रस्ता डांबरीकरण कामांचे भूमिपुजन आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यामध्ये नागरी सुविधा मधून मंजूर झालेल्या पिंगुळी शेटकरवाडी गणेश मंदिर ते गणेश कोंड जाणारा रस्ता, पिंगुळी शेटकरवाडी रविंद्र मोर्ये घर ते वहाळ पर्यंत जाणारा रस्ता, पिंगुळी गुढीपुर हायवे ते दळवी घरापर्यंत जाणारा रस्ता हे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. अनेक दिवसापासून हे रस्ते मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत होती. आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे.याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आ. वैभव नाईक यांचे आभार मानले. यावेळी जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, सरपंच निर्मला पालकर ,उपसरपंच सागर रणसिंग, ग्रा सदस्य शिवदास मसगे, परशुराम गंगावणे,जयवंत गावडे ,प्रमोद धुरी ,महेश पालकर ,सिद्धार्थ धुरी ,सुनील पालव,उमेश सावंत,निखिल सावंत ,संजय मोर्ये आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..