कुडाळ /-
महाराष्ट्र शासनाचे नोंदणीकृत अभियंते असल्याने व शासन आपले सर्व निर्णय एखाद्या GR मधून प्रसिद्ध करत असते पण हे सर्व निर्णय या अभियंत्यांच्या हिताचे आहेतच असे नाहीत. काही वेळा या जाचक नियमांमुळे काम करताना त्यांना विनाकारण आर्थिक व मानसिक त्रास होतो. त्यांना काम करताना सर्व प्रकारचे नियम पाळावे लागतात पण शासनावर असे काही निर्बंध नाहीत. अशा अनेक अडचणी सुबे अभियंता समोर आहेत.आणि हे फक्त कामामध्ये स्पर्धा करत राहतात आणि शासन त्यांना खेळवत राहते आणि याचा फायदा नकळत शासनालाच होतो आणि त्यामध्येच आपण अभियंता संपतो. अशाच समस्ययांचा निराकरणासाठी एक संघटना आज राज्य स्तरावर काम करत आहे. जर या अभियंत्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुबेंचा समस्या सोडवायचा असतील तर आपले प्रतिनिधी या राज्य कमिटीत असणे गरजेचे आहे.
आणि त्यासाठी त्यांना तालुका पातळीवर कमिटी करून त्यानंतर जिल्हा कमिटी केली जाईल आणि त्यातून आपले प्रतिनिधी राज्य कमिटी वर पाठवले जातील जेणेकरून आपल्या प्रत्येक सुबेंचा अडीअडचणी हया मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतील. यासाठी कुडाळ तालुका सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना स्थापन करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी ओंकार वाळके, उपाध्यक्ष पदी मुकेश पालव, पूनम वारंग तर सचिव पदी मंदार कोठावळे यांची निवड करण्यात आली आहे.तसेच ही संघटना महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ चे अध्यक्ष श्री. मिलिंदजी भोसले यांचा प्रेरणेतुन आणि आपल्या सिंधुदुर्गचे राज्य उपाध्यक्ष उदयजी पाटील व राजेशजी देशमुख यांचा मार्गदर्शनाखाली तयार केलेली आहे असे संघटनेचे अध्यक्ष ओंकार वाळके यांनी यावेळी सांगितले.