प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळमद्धे आम.वैभव नाईक यांना निवेदन..

प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळमद्धे आम.वैभव नाईक यांना निवेदन..

कुडाळ /-

प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळमद्धे आज आमदार वैभव नाईक यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि यासंदर्भात आणि या समस्या शासन दरबारी पोचवण्यासाठी सांगण्यात आले.सरकारने कर कायदे लागू केले जात आहेत,ते अत्यंत जाचक आहेत त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी, पश्चिम महाराष्ट्र कर प्रक्टिशनर्स असोसिएशनने २९ जानेवारी महात्मा गाधीजी याच्या पुण्यतिथी निमित्त निषेध पुकारला आहे.

त्याला देश भरातुन प्रतिसाद मिळत आहे.अनेक व्यापारी संघटना, कर सल्लागार व सनदी लेखापाल याच्या विविध असोसिएशन उत्स्फूर्तपणे या निषेधात सामील होत असुन जीएसटी कायद्याच्या जाचक तरतुदी विरोधात निषेध नोंदवित मागण्यांचे निवेदन ही देण्यात येणार आहे.या दरम्यान निषेध आंदोलन २९ जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यलयावर निषेध आंदोलन केले जाणार आहे,याच पाश्वभूमी वर यावेळी कुडाळ-मालवण चे श्री. आमदार वैभव नाईक यांना ही जीएसटी कायद्याच्या जाचक तरतुदी विरोधात या बाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.आणि आमदार वैभव नाईक यांच्याशी चर्चा करण्यात आली.

यावेळी निवेदन देतेवेळी यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे, प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे सदस्य, उपाध्यक्ष हेमंत वालकर, सचिव प्रमोद जांभेकर, खजिनदार जयंती कुलकर्णी, सदानंद सामंत, विलास देऊलकर सी ए अशोक सारंग, गिरीश तिरोडकर, नागेश नाईक, शैलेश मुंड्ये, विनायक जांभेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..