२९ जानेवारीपासून पासून नेहरुनगर बांबुळी येथे तटरक्षकदल रत्नागिरीचे गोळीबार प्रशिक्षण सुरू…

२९ जानेवारीपासून पासून नेहरुनगर बांबुळी येथे तटरक्षकदल रत्नागिरीचे गोळीबार प्रशिक्षण सुरू…

कुडाळ पोलीस निरीक्षक श्री.शंकर कोरे यांचे नागरिकांना जवळपास नफिरण्याचे आवाहन..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या आदेशाप्रमाणे पुन्हा २९ जानेवारी २०२१ पासून कुडाळ तालुक्यातील नेहरुनगर (बाव-बांबुळी), या फायरिंग बट येथे कमांडंट भारतीय तटरक्षक दल स्थानक रत्नागिरी दलाच्या वतीने गोळीबार सराव करण्यात येणार आहे. तरी कुडाळ नेहरुनगर (बाव), फायरिंग बट चे नजीकचे ग्रामपंचयात हददीतील कविलकाटे ,बांबुळी, बाव या गावातील सर्व नागरीकांना या गोळीबार सराव दरम्यान कोणीही नागरीकांनी जवाळपास फिरू नये ,तसेच, गोळीबार सराव असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने फायरिंग बटच्या ठिकाणी मनुष्य, प्राणी वगैरे सदर मैदान व आजुबाजुच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी आहे याची नोंद घ्यावी.असे आवाहन कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.शंकर कोरे यांनी आवाहन केले आहे.

अभिप्राय द्या..