प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आबोकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मुख्याध्यापकांना सूचना..
सिंधुदुर्गनगरी /-
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात यावा. दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे .अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आबोकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सर्व मुख्याद्यापक याना दिल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमावेळी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. प्रत्येकाने माक्स लावावे व सोशल डिस्टंसिंग नियमांचे काटेकोर पालन करावे. शाळेमध्ये प्रभातफेरी किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तसेच विविध खेळांचे आयोजन करण्यात येऊ नये. सोशल मीडियाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थिनींचे देशभक्तीपर गाणे, भाषण आयोजित करावीत. तथापि ऑनलाईन कार्यक्रम किंवा ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे .ध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी .विद्यार्थी व पालकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून आवश्यक प्रबोधन करावे. तसेच तिरंगी माक्स खरेदी न करण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज खरेदी न करण्याबाबत प्रबोधन करावे. अशा मार्गदर्शक सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.