वेंगुर्ला /_
श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान जिल्हा सिंधुदुर्ग तालुका वेंगुर्ला येथील कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी वेंगुर्ला शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. प्रथम श्री रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे महाआरती करून बाईक रॅली ला सुरवात झाली. या प्रसंगी समस्त रामभक्तांनी यात उपस्थिती दर्शवली. रॅलीमुळे सर्व वातावरण राममय झाले होते. घोषणांनी आसमंत दुमदुमत होता.महिला आणि तरुण यांचा रॅलीमधील सहभाग लक्षणीय होता. महिला आणि तरुणवर्ग या अभियानाशी जोडला गेला आहे हे रॅलीतून निदर्शनास आले.या कार्यालयाचे उद्घाटन वारकरी संप्रदायाचे कुर्ले बुवा याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन व भारत माता, श्रीराम प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमास सुरवात झाली. या प्रसंगी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, सूर्यकांत खानोलकर, दादा कुबल,रवींद्र परब,अनंत आठल्ये, छायाताई कुबल,प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, अरुण गोगटे,बागलकर ,खवणेकर तसेच जिल्हा अभियान संयोजक सतीश घोटगे,वेंगुर्ला तालुका संयोजक गिरीश फाटक, सहसंयोजक मंदार बागलकर,नगरसेवक प्रशांत आपटे,साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, ऍड.सुषमा प्रभूखानोलकर,वृंदा गवंडळकर तसेच असंख्य राम भक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंदार बागलकर यांनी, प्रास्ताविक गिरीश फाटक यांनी केले.यावेळी सतीश घोटगे यांनी मार्गदर्शन केले.