सायंकाळी कुडाळ वंरडेश्वर मंदिर येथील अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी..

सायंकाळी कुडाळ वंरडेश्वर मंदिर येथील अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी..

कुडाळ /-

शनिवारी सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पिंगुळी वंरडेश्वर मंदिर येथील महामार्गावर मोटार सायकलला झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला या अपघाताबाबत रात्री उशिरापर्यंत कुडाळ पोलिस स्थानकात मात्र नोंद नव्हती.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदरचा हा मोटारसायकल चालक सावंतवाडीहून मालवणच्या दिशेने जात होता. यावेळी पिंगुळी वरंडेश्वर मंदिर जवळ महामार्गावरून जात असताना त्याची मोटारसायकल स्लिप होऊन हा अपघात घडला.

सदरचा हा अपघात महामार्गाचे काम सुरू असल्याने तेथे असलेल्या खड्ड्यांमुळे घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.घटनास्थळी तात्काळ स्थानिक नागरिकांनी जखमीला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तसेच पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. मात्र या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिस स्थानकात करण्यात आली नव्हती.

अभिप्राय द्या..