सावंतवाडी /-
दिनांक १३-०१-२०२१ रोजी सावंतवाडी डाक उपविभागातील आंबोली गावामध्ये, डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत,आंबोली पोस्ट कर्मचार् यानी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची सेव्हिंग व करंट अकाउंट्स उघडून गावातील व्यावसायिकांना डाक पे QR काेड चे वाटप केले, यामध्ये गावातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मेडिकल्स, चिकन शॉप्स, लाकडी खेळण्यांचे दुकान, सलुन, कोल्ड्रिंक्स शॉप्स अशा विविध व्यावसायिकांना डाक पे QR काेड चे वाटप केले, हा QR काेड स्कॅन करून ग्राहकांना अाता कॅशलेस पेमेंट्स करता येणार आहेत. पोस्ट ऑफिस ची ही सुविधा ग्राहक व व्यावसायिक यांना निश्चितच खूप उपयुक्त ठरणार आहे.. शिवाय अशाप्रकाच्या पोस्टाच्या डीजिटल पेमेंट सेवेचा प्रारंभ करणारे आंबोली पोस्ट आॅफिस हे सिंधुदुर्ग डिव्हिजन मध्ये पहिले ठरले आहे