केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी विजया श्रीपाद नाईक हे येल्लापूरहून गोकर्णला येत असताना गाडीला अपघात झाला.बेंगळुरु – केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीला कर्नाटकमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला इथं अपघात झाला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि त्यांची पत्नी विजया श्रीपाद नाईक हे येल्लापूरहून गोकर्णला येत असताना गाडीला अपघात झाला.यामध्ये श्रीपाद नाईक यांच्या पत्नी गंभीर झाल्या होत्या. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.