मालवण/
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच महिला विभाग मालवण च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती १२ जानेवारी,२०२१रोजी सायंकाळी ७ वाजता एसटी स्टँड मागील समाज मंदिर येथे साजरी करण्यात येणार आहे . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून टोपीवाला हायस्कूल, मालवण मधील शिक्षिका सौ. ज्योती तोरसकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.सोनल कदम उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्ष प्रतिभा मालवणकर यांनी केले आहे