वेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग पोलीस दल व वेंगुर्ला पोलीस ठाणे आयोजित रेंजिग डे कार्यक्रम रा.कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला येथे आर.एस.पी विभाग(नागरी संरक्षण व वाहतूक विभाग)यांच्या वतीने व वेंगुर्ला पोलीस ठाणे निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
वाहतूक व महिलांवरील अत्याचार, बाल गुन्हेगारी इ.बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पोलीस मनोज परूळेकर ,पांडुरंग खडपकर वाहतूक विभाग, महिला पोलीस अंमलदार रूपाली सावंत, महिला व बाल अत्याचार निवारण
मुख्याध्यापक प्रकाश जाधव,आर.एस.पी.अधिकारी किशोर सोनसुरकर उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये विदयार्थ्यांनी या बाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. आभार समीर पेडणेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page