ग्रामीण भागातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विश्वनाथ नाईक तर नेमळेतील दिव्या वायंगणकर यांना जाहीर..
सिंधुदुर्ग /-
सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्यावतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो, जिल्हा प्रेस क्लब ने यावर्षी चे पुरस्कार जाहीर केले असून सावंतवाडी शहरातून कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक आनंद धोंड यांना कैलासवासी सूर्यकांत वाडकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा ग्रामीण भागातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मडुरा येथील दै पुढारीचे प्रतिनिधी विश्वनाथ नाईक यांना तर जिल्हा प्रेस क्लब चे कोषाध्यक्ष कै.,संदिप सावंत स्मृती पुरस्कार नेमळेतील सिंधुप्रगती साप्ताहिकाच्या संपादिका दिव्या वायगंकर यांना जाहीर करण्यात आला आहे,
याबाबतची घोषणा जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष उत्तम वाडकर संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे अनंत जाधव सचिव राकेश परब उपाध्यक्ष संदेश सावंत नाथा कदम यांनी जाहीर केले आहे.
या पुरस्कारा चे स्वरूप रोख रक्कम, शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे ठेवण्यात आले आहे,लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आली, यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारितेतील आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यात आली.