स्थानिक गुन्हे अन्वेषण यांचेकडून अंमली पदार्थ गांजा ची अवैध विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहाथ पकडले..

स्थानिक गुन्हे अन्वेषण यांचेकडून अंमली पदार्थ गांजा ची अवैध विक्री करणाऱ्या इसमाला रंगेहाथ पकडले..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिनांक ०५/०१/२०२१ रोजी चारगांव तालुका कणकवली येथील एक इसम गांजा विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहे अशी गुप्त बातमी मिळालेली होती. मा. पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. तुषार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागचे पोलीस निरीक्षक श्री. सुनिल धनावडे यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन शेळके, पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, प्रमोद काळसेकर, ज्ञानेश्वर कांदळगांवकर, प्रकाश कदम, चंद्रहास नार्वेकर यांचे एक पथक व पोलीस उपनिरीक्षक श्री. शाहू देसाई,पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, संकेत खाडये, रवि इंगळे, गुरुदास कोयंडे, चंद्रकांत पालकर यांची दोन स्वतंत्र पथके तयार केली.

मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दोन्हीही पथकाने दिनांक ०५/०१/२०२१ रोजी सायंकाळी १८.४५ याजल्यापासुन मौजे वारंगांच- रोडयेचाडी तालुका कणकवली येथे विशिष्ठ पध्दतीने सापळा रचला होता. रात्री २१.०० वाजताचे दरम्यान बातमीदारांनी दिलेल्या वर्णनाप्रमाणे गांजा विक्री करणारा इसम हा एक पिशवी हातात घेऊन एका घराचे अंगणात संशयितरित्या थांबलेला दिसून आला. म्हणून त्यास २१.१० वाजता दोन्हीही पथकातील अधिकारी च अंमलदार यांनी त्यास घेराव घालून त्याच्याकडील पिशवीची खात्री केली. त्या पिशवीमध्ये ६७८ ग्रॅम ओलसर गांजा व १२ ग्रॅमच्या एकुण ४ प्लॉस्टीकच्या पुडया अशा एकूण ७२६ ग्रॅम वजनाचा गांजा ५००/- रुपये किमतीचा डीजीटल इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा आणि रोख रक्कम ५६०/- रुपये मिळून आले.

सदर आरोपीत यांने त्यांचे नांय प्रविण आत्माराम गुरव, वय ५० रा. यारगांव, रोडयेवाडी तालुका कणकवली असे सांगितले. सदर आरोपी हा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा ताब्यत बाळालेल्या स्थितीत रंगेहाथ मिळून आला. म्हणून त्यास कणकवली पोलीस ठाणे येथे आणून त्यांचे विरुष्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ ( क),२० (ब) (ii) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास कणकवली पोलीस ठाणे करीत आहे.

(एस.के.धनावडे) पोलीस निरीक्षक,

पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग

अभिप्राय द्या..