वेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर व हिंदी वृत्तपत्राचे जनक बाबुराव पराडकर ही दोन रत्ने आपल्या जिल्ह्याला लाभलेली आहेत. त्यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घेतल्यास खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो, असे प्रतिपादन डॉ.के. जी. केळकर यांनी केले.वेंगुर्ले होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ व ऍड. दत्ता पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन व पत्रकार दिनाचे आयोजन केले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश कोलगेकर, वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. पूजा कर्पे , प्रा. संजीव लिंगवत, डॉ. सतीश पाटील, डॉ. रवींद्र बुरुड, सचिव सचिन वराडकर ,खजिनदार सावळाराम भराडकर आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस डॉ. के. जी. केळकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना डॉ. पूजा कर्पे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी दर्पण साप्ताहिक काढले, म्हणून त्यांना दर्पणकार असे संबोधले जाते.मात्र खऱ्या अर्थाने घडणाऱ्या घटनांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचे काम दर्पणकार जांभेकर यांनी केले. त्यांचा आदर्श हा जीवनात पैलू पाडणारा ठरू शकतो. डॉ. संजीव लिंगवत यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचा इतिहास उलगडताना खडतर अशा प्रसंगात आपले जीवन दर्पणकार यांनी कसे घडविले याचा आलेख मांडला. पत्रकार हा जनतेचा आरसा आहे, त्यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी अंगीकृत करावा असे सांगितले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश कोलगेकर यांनी दर्पणकारांच्या काळातील पत्रकारिता व आताची एकविसाव्या शतकातील पत्रकारिता ही कशी क्रमाक्रमाने बदलत गेली या पत्रकारितेतील शिक्षणातील व रोजगारातील संधी याबाबतही मार्गदर्शन केले. प्रथम उपस्थितांचे स्वागत संजीव लिंगवत यांनी केले तर आभार सावळाराम भराडकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page