रातोरात कुडाळ पोलिसांकडून लाखो रुपयाचा ममुद्देमाल जप्त..
कुडाळ /-
दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. कोरे यांची भेट घेऊन तालुक्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी स्मरणपत्र निवेदन सादर केले.कुडाळ तालुक्यात जुगार,मटका व गावठीसह गोवा बनावटीची दारू विक्री आदि अवैध व्यवसाय मागील काही कालावधीपासून फोफावू लागत असल्याने जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढू लागल्याचे चित्र आहे.अशा अनैतिक व्यवसायांवर काही पोलीस कर्मचाऱ्यांचा वरदहस्त असल्याने अवैध व्यवसायांविरोधात भूमिका घेणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांवर व प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.ज्यामुळे ठिकठिकाणी माफियाराज बोकाळल्याची परिस्थिती निर्माण झालेली असल्याने तालुक्यातील कायदा सुव्यस्था बिघडू नये व या अवैध व्यवसायांना आळा बसावा यासाठी मनसेच्या वतीने याआधी ही पत्रान्वये आपले लक्ष वेधले होते. मात्र पोलीस प्रशासनाकडून अशा व्यवसायांवर व व्यावसायिकांवर अद्याप ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.याउलट मागील काही कालावधीपासून अशा बेकायदा व्यवसायांत वाढ झाल्याचे तालुक्यातील स्थानिक जनतेकडून नेहमी सांगण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे.काही दिवसांपूर्वी मनसेच्या माध्यमातून तालुक्यात गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडून देत या विक्रीमागच्या खऱ्या सूत्रधारांचा शोध घेवून मुळासकट बिमोड करावा अशा अपेक्षेने आपल्या ताब्यात देण्यात आलेले होते.
त्या अनुषंगाने आपले कर्मचारी शोधमोहिम करत आहेत ह्यात दुमत नाही मात्र या व्यवसायामागचे खरे सूत्रधार अद्याप पर्यंत मोकाट असून उजेडात आलेले नाही,त्यामुळे आजची तरुण पिढी व्यसनाधीन होवून निष्क्रिय होईल हे भविष्यातील संकट ओळखून गांभीर्यपूर्वक अवैध व्यवसायांविरोधी धडक कारवाई मोहीम तात्काळ हाती घ्यावी अशी मागणी मनसेने दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,जिल्हा सचिव बाळा,पावसकर,उपतालुकध्यक्ष दिपक गावडे व अविनाश अणावकर,मनसे विद्यार्थी सेना उप जिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर, मनवीसे तालुकाध्यक्ष गुरू मर्गज,विभाग अध्यक्ष रामा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.