कुडाळ /-
मुळदे येथील राजेंद्र केशव पाताडे (५३) हे आपल्या राहत्या घरातून घरात कोणालाही काहीही न निघून गेले आहेत. ही घटना रविवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास घडली. पती बेपत्ता झाले असल्याची फिर्याद कुडाळ पोलिसात पत्नी सौ सिद्धि पाताडे यांनी दिली आहे.
पत्नी सौ सिद्धी पाताडे या ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वा घरातील गृहपयोगी काम करत होत्या. यावेळी पती राजेंद्र पाताडे हे कपडे घालून बाहेर कोठेतरी निघून गेले. यानंतर दुपारी १ वा. पर्यंत पती जेवणासाठी घरी न आल्याने पती कडील दोन्ही मोबाईल क्रमांकावरून फोन केला. मात्र दोन्ही फोन स्विच ऑफ असल्याने एका नातेवाईकांनाही फोन करण्यास सांगितले. मात्र त्यांनाही दोन्ही क्रमांक स्विच आँफ लागले. यानंतर सौ पाताडे यांनी अन्य नातेवाईक यांनाही फोन करून विचारल्यावर त्यांच्या बाबत कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे पत्नी सौ सिद्धी पाताडे यांनी पती राजेंद्र पाताडे हे बेपत्ता झाले असल्याची फिर्याद सोमवारी कुडाळ पोलिसात दिली आहे.