वेंगुर्ला /-
वेंगुर्ला बंदरवर येणा-या पर्यटकांच्या, नागरिकांच्या तसेच तेथे मच्छिमारी व मच्छिविक्री करणा-या महिला व पुरुषांसाठी नगरपरिषदेतर्फे कंटेनर टॉयलेट उभारण्यात आले आहे.या कंटेनर टॉयलेटचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.वेंगुर्ला बंदरवर वर्षभर पर्यटकांची तसेच स्थानिक नागरीकांची ये-जा तसेच हंगामी मच्छिमारी व मच्छिविक्रीही सुरु असते. परंतु, इथे टॉयलेटची सोय होणे आवश्यक होते. याठिकाणची जागा ही मेरिटाईमे बोर्डाच्या अखत्यारीत येत असल्याने येथे कायमस्वरुपी टॉयलेट उभारणे नगरपरिषदेला शक्य नव्हते. दरम्यान, वेंगुर्ला नगरपरिषदेने याकडे प्राधान्याने लक्ष देऊन स्त्रीया आणि पुरुषांसाठी कंटेनर टॉयलेटची सोय केली आहे. या कंटेनर टॉयलेटमध्ये शौचालय, वॉशरुम आणि चेंजिग रुमची व्यवस्था उपलब्ध आहे.या कंटनेर टॉयलेटच्या उदघाटन वेळी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर,नगरसेविका श्रेया मयेकर, धर्मराज कांबळी, माजी उपनगराध्यक्ष गिरगोल फर्नांडीस, प्रशासकीय कर्मचारी शैलेश सातार्डेकर, सागर चौधरी आदी उपस्थित होते. नगरपरिषदेने उभारलेल्या कंटेनर टॉयलेटमुळे पर्यटक, मच्छिमार, मच्छिविक्रेते व नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.