अकस्मात मृत्यूमधील व्हिसेरा तपासणीसाठी जमा करुन घेण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दिंडोरी रोड येथील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील सहायक संचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. अमासिद्ध तिपण्णा पांढरे असे अटक करण्यात आलेल्या सहायक संचालकाचे नाव आहे.
अमासिद्ध पांढरे यांची नेमणूक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील विषशास्त्र विभागात आहे. सिन्नर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या अकस्मात मृत्यूमधील व्हिसेरा जमा करण्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. अकस्मात मृत्यूमधील व्हिसेरा तपासणीसाठीआहे. अकस्मात मृत्यूमधील व्हिसेरा तपासणीसाठी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नाशिक जमा करुन घेण्याच्या मोबदल्यात अमासिद्ध पांढरे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. सहायक संचालक, विषशास्त्र विभाग रुम क्रमांक २०८, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पांढरे यास पथकाने अटक केली.