मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट..

मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाललेल्या राजकीय घडामोडींची झाली सकारात्मक चर्चा..

कुडाळ /-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष धीरज परब यांनी आज मुंबई येथे कृष्ण कुंज निवास स्थानी भेट घेतली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष वाढीच्या दृष्टीने आज राज साहेबांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कानमंत्र दिला. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाललेल्या राजकीय घडामोडींची सकारात्मक चर्चा केली.पक्ष वाढीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नवीन वर्षात पक्ष निरीक्षक म्हणून मुंबईत स्थित पदाधिकारी नियुक्त करावा अशी मागणी या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री.धीरज परब यांनी केली.आपण आपले कार्य अविरत चालू ठेवा पक्ष संघटनेच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींना थेट माझ्याशी संपर्क करावा अशा सूचनाही राज ठाकरे साहेबांकडून देण्यात आल्या.तसेच पक्षाच्या सर्व अंगिकृत संघटना जिल्ह्यात भक्कम करण्यासाठी कार्यरत रहा असा आदेश या वेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्रा राज्य परिवहन जिल्हा उपाध्यक्ष बनी नाडकर्णी, मनविसे विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष शैलेश श्रूंगारे, सावंतवाडी तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे, मालवण माजी तालुकाध्यक्ष गणेश वाईरकर, कुडाळ उपतालुकाअध्यक्ष जगन्नाथ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..