बँक ऑफ बडोदा या नॅशनलाइझ बँक मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर  पदांच्या जागा निघाल्या असून अर्ज भरावयाची अंतिम तारीख ८ जानेवारी २०२१ आहे.
इच्छुक उमेदवार bankofbaroda.in या साईट वर अर्ज करु शकता.
यात 27 पदे सिक्युरिटी ऑफिसर तर 5 पदे फायर ऑफीसर अशी एकूण 32 पदे रिक्त आहेत.
या अर्जाकरिता सामान्य व ओबीसी उमेदवारांना 600 तर एस सी/एन टी उमेदवारांना 100 रुपये शुल्क लागू होईल.
अर्ज करण्याकरिता bankofbaroda.co.in या साईट वर जाऊन करियर या पेज वर क्लीक करा.
त्यात bank of Baroda career detail पेज वर नोटिफिकेशन आल्यावर link to apply वर क्लिक करून अर्ज भरू शकता.
यात सिक्युरिटी ऑफिसर पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणे अनिवार्य आहे. तसेच फायर ऑफीसर साठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाच्या सेफ्टी अँड फायर इंजिनिरिंग किंवा फायर टेकॅनॉलॉजि अँड सेफ्टी इंजिनीअरिंग डिग्री अनिवार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page