निवती ग्रामस्थांचा प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत उपोषणाचा दिला ईशारा
कुडाळ /-
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निवती रस्त्याचे बंद आवस्तेतील काम सुरू करा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असा ईशारा निवती येथिल ग्रामस्थांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्हा कार्यालयाला भेट देत येथील मुख्य कार्यकारी अभियंता श्री.ए .जे .पाटील यांना निवती ग्रामस्थांनी निवेदन देत काम बंद असलेल्या रस्त्या संदर्भात चर्चा केली.आणि लवकरात लवकर काम सुरू करा आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळा असे सांगण्यात आले.यावेळी निवती येथील सरपंच भारती धुरी, ग्रामस्थ विलास आरोलकर ,नागेश सारंग ,रामचंद्र भगत,रामदास मेंतर ,निवृत्ती खवणेकर ,नरसिव्ह भगत ,अजित खवणेकर अन्य निवती ग्रामस उपस्थित होते.
पर्यटनदृष्टया विकास होत आलेल्या निवती गावासाठी गेली दोन वर्षे पूवी
निवती- म्ह|पण रास्ता या मुख्यमंत्री ग्रामसडक योजने आंतर्गंत मंजूर झाला असून या कामाला संबधीत ठेकेदाराने फक्त दोनच महिने कांम करून सदरचे काम हे बंद केले आहे.ग्रामस्थानी म्ह|पण निवती रस्त्याचा रास्ता रोको आदोलनाचा इशारा दिल्यावर निवती पोलीस ठाण्यात आम्हा ग्रामस्थांना बोलापण्यात आले होते. त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने उपस्थित राहणे अपेक्षित होते पण ठेकेदार उपस्थित,राहिला नाही सदर ठिकाणी महाराष्ट्र रस्ते ग्रामीण विकास संस्था सहाययक अभियंता उपस्थित राहिले होते आणि त्यांनी सांगितले की हे काम आता सुरळीत होणार,आंदोलन नका करू यावर ग्रामस्थांनी निवती पोलीस निरीक्षक अमोल साळुंके यांच्या,मार्गदर्शनाखाली आंदोलन मागे घेतले होते.मात्र आता चतुर्थी झाली, पावसाळा झाला,दिवाळी झाली तरी काम सुरू होत नसल्याने निवती ग्रामस्थांनी या रस्ता काम सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा ईशारा निवती ग्रामस्थांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.