सरकारी नोकरी मध्ये ७०० हून अधिक पदांवर भरती.;जाणून घ्या..

सरकारी नोकरी मध्ये ७०० हून अधिक पदांवर भरती.;जाणून घ्या..

 

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने (BECIL) नॉन-फॅकल्टी ग्रुप बी आणि सी च्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे निवडलेले उमेदवार एम्स भोपाळ (AIIMS Bhopal) येथे नियुक्त केले जातील. ही भरती अनेक वेगवेगळ्या पदांवर होणार आहे. पीजी विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्णांपासून ते पीजीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुण होतकरु उमेदवारांना या भरतीद्वारे

बेसिलच्या अधिकृत वेबसाइटवर एक अधिसूचना जारी केली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया १० डिसेंबर 2020 पासून सुरू झाली आहे. अधिसूचना आणि ऑनलाइन अर्जाच्या लिंक्स पुढे दिल्या आहेत.एकूण 727 पद भरती होणार आहे.

यांत कॅशियर, इलेक्ट्रिशियन, स्टेनोग्राफर, अप्पर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर टू अ‍ॅडमिन ऑफिसर, सहाय्यक अभियंता, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्ररीयन, मॅनेजर, डायटिशियन सह अनेक प्रकारची पदे रिक्त आहेत. .शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा याबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

या रिक्त पदांसाठी, बेसिलच्या वेबसाइटवर becil.com किंवा becilaiimsbhopal.cbtexam.in वर अर्ज करता येईल. पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून देखील अर्ज भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२० आहे.अर्जामधील तांत्रिक अडचणींसाठी – khuswindersingh@becil.com व्यतिरिक्त तांत्रिक बाबींसाठी – mahesh chand@becil.com या इमेलवर संपर्क साधावा.उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अभिप्राय द्या..