रत्नागिरी /-
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
▪️01 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्रासाठी निर्गमित करण्याची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आपले अर्ज
www.barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवर परिपूर्ण भरल्यानंतर आवश्यक दस्तऐवज अपलोड करुन ऑनलाईन सबमिट करावेत. तद्नंतर त्याची प्रिंट घेऊन आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारशीने समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. जुन्या पद्धतीने हस्तलिखित स्वरुपातील अर्ज समिती कार्यालयात स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
सीईटी सेलने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या बहुतांशी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अंतिम मुदत 30 व 31 डिसेंबर 2020 आहे.
त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समिती कार्यालयात विद्यार्थी व निवडणूकीचे उमेदवार यांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. समिती कार्यालयात अपुरे मनुष्यबळ आहे.सद्या कोव्हीड-19 च्या महामारीच्या परिस्थिती संपूर्ण जगाला भेडसावत आहे अशावेळी अभ्यांगतांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे जेणेकरुन कोव्हीड-19 चा प्रार्दुभाव वाढणार नाही, असे संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.