सिंधुदुर्गनगरी,/
सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाज आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज दिनांक १०-९-२०२० रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलनाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित सामंत आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन महा संघाचे अध्यक्ष श्री.एम.बी.जाधव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
आपल्या समाजाच्या मागण्यांची पूर्तता लवकर होण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून आपल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून आपण समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे.यावेळी सुनील भोगटे,अनंत पिळणकर, अशोक पवार, रुपेश जाधव,देवेंद्र पिळणकर, गौरेश पारकर, मयूर जाधव आदी उपस्थित होते.