नाशकात चार पुरुषांची आत्महत्या

नाशकात चार पुरुषांची आत्महत्या

नाशिक शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरात रविवारी (दि.१३) एकाने आणि सोमवारी (दि.१४) एकाच दिवशी तीन जणांनी जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी सातपूर, अंबड, पंचवटी व नाशिक रोड पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. सातपूर येथील रोहिदास भीमराव वाघमारे (४७), कामटवाडा येथील रुपेश भटू कासार (वय ४०), गणेशनगर, अमृतधाम येथील प्रविण बाळकृष्ण देवरे (वय २८) आणि भीमनगर, नाशिकरोड येथील अमोल सतिश हिरे (वय १९) यांनी आत्महत्या केल्या आहेत.

पहिल्या घटनेनुसार, सातपूर येथील रोहिदास वाघमारे यांनी रविवारी (दि.१३) ११.३० वाजेदरम्यान घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अक्षय रोहिदास वाघमारे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करत आहेत.

दुसर्‍या घटनेनुसार, कामटवाडा येथील रुपेश भटू कासार यांनी सोमवारी (दि.१४) दुपारी ३ वाजता राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस हवालदार महाजन करत आहेत.

तिसर्‍या घटनेनुसार, गणेशनगर, अमृतधाम येथील प्रविण बाळकृष्ण देवरे (वय २८) विषारी औषध पिवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस हवालदार ए. बी. गायकवाड करत आहेत.

चौथ्या घटनेनुसार, भीमनगर, नाशिकरोड येथील अमोल सतिश हिरे (वय १९) याने सोमवारी (दि.१४) दुपारी ३ वाजेदरम्यान गळफास आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस हवालदार कोल्हे करत आहेत.

 

अभिप्राय द्या..