▪️तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्मराणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त मोजावे लागणार आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना झाला असून कोलकात्याने तो ६७०.५० रुपये तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोहचला आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी ६६० रुपये मोजावे लागत आहेत.

▪️आजची दरवाढ होण्याआधी दिल्लीमध्ये १४.२ किलो गॅस सिलिंडरचे दर ५९४ रुपये इतके होते. कोलकात्यामध्ये ६२०.५० रुपये तर मुंबईमध्ये ५९४ रुपयांना गॅस सिलिंडर मिळायचा. मात्र आता यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असणाऱ्या सर्वासामान्यांच्या खिशाला या दरवाढीची झळ बसणार आहे. १९ किलोच्या सिलिंडरची दिल्लीमधील किंमत एक हजार २९६ रुपये, कोलकात्यामध्ये एक हजार ३५१ रुपये ५० पैसै, मुंबईमध्ये एक हजार २४४ रुपये आणि चेन्नईमध्ये एक हजार ४१० रुपये ५० पैशांपर्यंत गेली आहे. गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या सबसिडीअंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १२ गॅस सिलिंडरवर सूट देते. ग्राहकांना या कालावमध्ये अधिक सिलिंडर लागले तर त्यांना बाजार भावात ते विकत घ्यावे लागतात. तेल कंपन्या दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या किंमतीची तपासणी करुन आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशातील दरांनुसार गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page