पत्नीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही.लॉकडाउन मध्ये आपण पोलीस अधिकारी झाल्याचे सांगत पत्नीला खुश करण्यासाठी युनिफॉर्म घालून पुण्यात आलेल्या एकाला वानवडी पोलिसानी अटक केली.भाऊसाहेब महादेव गोयकर (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वानवडी पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पोलिसांच्या गणवेशातील एक संशयास्पद व्यक्ती दिसला.
त्याचा खांद्यावर ‘मपो’ ऐवजी ‘मपोसे’ असे लावले होते. त्यामुळे पोलीसना संशय निर्माण झाला. पोलिसांनी त्याच्याकडे ओळ्खपत्राची मागणी केली असता त्याच्याकडे नव्हते. अधिक चौकशी केली असता आपण पोलीस नासल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक चौकशीत त्याने सांगितले की लॉकडाउन मध्ये आपण पोलिसात भरती झाले आहोत असे खोटे पत्नीला सांगितले होते.त्यामुळे पत्नीला खरे वाटावे म्हणून तो युनिफॉर्म घालून रामटेकडी येथे पत्नीसोबत बँकिंग च्या परीक्षेसाठी आला असल्याचे सांगितले.
