जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीनी घेतले दर्शन..
कुडाळ /-
जिल्हा प्रमुख संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र संजय पडते ( वय-२७) यांचे बुधवारी मध्यरात्री गोवा येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरु असताना आकाली निधन झाल्याने आज संपुर्ण कुडाळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.शोकाकुल वातावरणात दुपारी देवेंद्र याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.आज दुपारी शोकाकुल वातावरणात दुपारी देवेंद्र पडते याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध व्यक्तीनी अंतीम दर्शन घेतले. देवेंद्र यांच्या अकाली निधनामुळे कुडाळवर शोककळा पसरली. ही घटना समजताच खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती शारदा कांबळी, सावी लोके, माधुरी बांदेकर, जिल्हा परिषद सदस्य अमरसेंन सावंत, गटनेते नागेंद्र परब, समिधा नाईक, कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे, नगराध्यक्ष ओंकार तेली, मालवण नगराध्यक्ष महेश कं|दळगावकर, काका कुडाळकर, सुनिल भोगटे, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे, राकेश कांदे, आबा धडाम, सुनील बांदेकर, संध्या तेरसे, राजू मुळीक, संजय भोगटे, अतुल बंगे, अभय शिरसाट, आनंद शिरवलकर, चेतन पडते, राजेश महाडेश्वर, सुशांत पांगम, बंड्या मांडकूलकर, विकास कुडाळकर, वर्षा कुडाळकर, सभापती नुतन आईर, यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तसेच इतर क्षेत्रातील विविध व्यक्तीनी अंतिम दर्शन घेतले. दुपारी कुडाळ बाजारपेठे ते महापुरूष येथील सार्वजनिक स्मशानभूमी पर्यंत अंत्ययात्रा काढत देवेंद्र वर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देवेंद्र याने इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देवबाग येथे रीसाॅर्ट सुरु केले होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे अल्पावधीत त्याने लहान, मोठे, वृद्धाच्या मनातही आपुलकी निर्माण केले, अनेक मित्र जोडले होते.
देवेंद्रच्या अकाली जाण्याने अष्टपैलू हरहुन्नरी व्यक्तीला आपण मुकलो, अशा शब्दांत खासदार राऊत तसेच इतर मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली. देवेंद्रच्या पश्चात आई, वडिल, बहिण, काका असा मोठा परीवार आहे.