कुडाळ/अमिता मठकर
कुडाळ नगरपंचायतीचे शिवसेनेचे कार्यतत्पर नगरसेवक श्री.देवानंद उर्फ सचिन काळप यांचा आज वाढदिवस.या निमित्ताने श्री.सचिन काळप यांनी आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला.त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत पणदूर येथील सविता आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवक सचिन काळप यांच्या सोबत नगरसेविका सौ.उषा आठले, पप्या धुरी, हर्षद काळप, केदार काळप, संतोष कुडाळकर, शैलेश काळप, गोटया धुरी, आशु काळप, सुनील सावंत, राहुल शिरसाट, अभिजीत घाडी, डॉक्टर परब मॅडम, पोलीस पाटील होते.सचिन काळप यांचा मित्र परिवार मोठा आहे.तसेच त्यांना राजकीय,सामजिक,क्रीडा या सर्व क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छाचा वर्षाव केला.