नेरूर येथे वयोमर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.;युवासेनेचे रूपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन..

नेरूर येथे वयोमर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.;युवासेनेचे रूपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन..

कुडाळ /-

नेरुर गावचे युवासेनेचे धडाडीचे कार्यकर्ते कुमार चिन्मय पोईपकर आणि मित्रमंडळ आयोजित नेरूर येथे वयोमर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हे ‘ युवासेना चषक ‘ करण्यात आले.या स्पर्धेचे श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना शिवसेनेचे मा.श्री.रूपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.पुढे रुपेश पावसकर म्हणाले की,खेळ हा मानवी जीवनासाठी एक महत्त्वाचा घटक आहे.खेळामुळे माणसाचे आरोग्य सुदृढ होते बनते व मनुष्य यामुळे तंदुरुस्त होतो.त्यामुळे ईतर खेळाप्रमाणे क्रिकेट या खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे.असे रुपेश पावसकर या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर. सोबत,माजी पंचायत समिती सदस्या सौ.दिपश्री नेरूरकर, बाळा पावसकर, मंजूनाथ फडके, कुडाळ माजी ग्रा पं सदस्य नितीन सावंत, मंगेश बांदेकर, चिन्मय पोईपकर, विकास नेरूरकर आणि इतर. युवासेना कार्यकर्ते व नेरूर ग्रामस्थ क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..