कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ”कोरोना योद्धा” म्हणून सेवा बजावणाऱ्या आडेली गावातील शिक्षक व ग्रामसेवक यांचा शिवसेना पक्ष आडेली शाखेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये गोपीनाथ दाभोलकर, दाभोलकर ,नीलकंठ धर्णे, जकुलवाड, वैष्णवी केळुसकर, ग्रामसेवक विकास केळुसकर यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच प्रकाश गडेकर, शिवसेना पदाधिकारी सचिन गडेकर,नितीन मांजरेकर, उपसरपंच संतोष कासले,ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा घोंगे, ग्रा.पं.सदस्य घनश्याम नाईक,प्रशांत मुंडये, बाळू सावंत, पुरुषोत्तम धर्णे,उमेश केळुसकर, आनंद केळुसकर, तुषार कांबळी आदी उपस्थित होते.