आचरा /-

आईच्या रागाला वैतागून घर सोडून गेलेल्या चिंदर येथील मुलीला आचरा पोलीसांनी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत पेट्रोलींग दरम्याने ताब्यात घेतले.सदर मुलीची ओळख पटवून बालकल्याण समिती कणकवली समोर हजर केले आहे.
आचरा पोलीसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे मुलीची परत घरवापशी झाली आहे.

पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार हरविलेल्या,पळविलेल्या, घरातून निघून गेलेल्या लहान मुलांच्या शोधासाठी१डिसेंबर ते ३१डिसेंबर या कालावधीत आॅपरेशन मुस्कान मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रेल्वे स्थानके, बसस्थानके, रस्त्यावर भीक मागणारी मुलं, कचरा गोळा करणारी मुले, रुग्णालये,हाॅटेल्स, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या मुलांना हरवलेली मुलं समजून त्यांची चौकशी केली जाणार आहे.
या अनुषंगानेआचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस फौजदार सावंत, महिला हेडकॉन्स्टेबल देसाई, पोलीस नाईक अक्षय धेंडे आदी पोलीस कर्मचारी आॅपरेशन मुस्कान मोहीम अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना गुरुवारी तीन डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास चिंदर कुंभारवाडी येथील कु.कृतिका कृष्णा चिंदरकर वय वर्षे १७ ही मुलगी आचरा बंदर येथे आढळून आली.आचरा पोलीसांनी तीला विश्वासात घेत तीची विचारपूस केल्यावर आई घरात सतत रागावते म्हणून घरात कोणालाही न सांगता निघून आल्याचे सांगितले.पोलीसांनी तीला आपल्या सोबत घेऊन आचरा पोलीस स्टेशनला आणत तीचे वडील कृष्णा चिंदरकर यांचेशी संपर्क साधला. सदर सापडलेली मुलगी असल्याची असल्याची खात्री केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी त्यांना मार्गदर्शन करत शासन आदेशानुसार सदर मुलीला महिला हवालदार देसाई यांच्या सोबत बाल कल्याण समिती समोर हजर करण्याकरिता कणकवली येथे पाठविण्यात आले होते.त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page