कुडाळ /-
तालुक्यातील वयोवृद्ध लाभार्थी आहेत. अशा लाभार्थ्यांना उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करून वयोवृद्धांना विशेष सवलत देऊन त्यांचे प्रस्ताव गाव तलाठी मार्फत समिती सभेमध्ये यावेत अशा सूचना आज झालेल्या समिती सभेमध्ये अध्यक्ष अतुल बंगे यांनी देऊन आजच्या सभेमंध्ये ४६ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.आज कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समितीची सभा समिती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी सचिव तहसीलदार अमोल फाटक ,अतिरिक्त गटविकास अधिकारी भोई ,सदस्य श्रेया परब ,बाळा कोरगावकर ,प्रवीण भोगटे ,महेश सावंत,दिलीप सर्वेकर ,संजय पालव,महादेव पालव हे उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांच्या शिफारीसी नुसार वरील प्रस्तावांना मंजुरी देताना वयोवृद्धांच्या विचार करताना काही खास सवलती देऊन समिती समोर आलेल्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.