वैभववाडी/

वैभववाडी बाजारपेठ त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे गेले 14 दिवस वैभववाडी बाजारपेठ कटेनटमेंट झोन जाहीर करण्यात आला. गेले 14 दिवस संपूर्ण बाजारपेठत कडकडीत बंद पाळण्यात आला.14 दिवसांनंतर आज पुन्हा बाजारपेठ गजबजणार आहे.या बंद कालावधीत नगरपंचायत वाभवे – वैभववाडी च्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण नं .प.हद्दीत स्वच्छता राबविली .संपूर्ण बाजारपेठमध्ये फवारणी करून निर्जंतुकिकरण करण्यात आले.सडूरे रोड, मच्छी मार्केट ची मार्केट , संभाजी चौक या भागातील सर्वच ठिकाणी कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळले होते.
गेले चौदा दिवस वैभववाडी बाजारपेठ संपूर्ण बंद होती.अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल स्टोअर्स, पेट्रोल पंप व बँका फक्त सुरू होत्या इतर जीवनावश्यक वस्तू ची दुकाने पूर्णपणे बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची मोठी गैरसोय झाली होती.ऐन म्हाळवसाच्या महिन्यात वैभववाडी शहरातील मुख्य बाजारपेठ बंद असल्यामुळे याचा परिणाम शहरी व ग्रामीण भागातील जनतेवर झाला .किराणा माल व भाजी व इतर वस्तू साठी लोकांची मोठी गैरसोय झाली.कोरोनाचा संसर्ग आटोक्यात यावा खबरदारी म्हणून गेले 14 दिवस व्यापारी व किरोकळ विक्रेते,ग्रामिण भागातील किरकोळ विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला.
मेडिकल स्टोअर्स व पेट्रोल पंप ,सिंधुदुर्ग बँक,ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र या बँका सुरू होत्या.मंगळवारी सर्व शासकीय कार्यलयामध्ये 50% उपस्थिती होती. किराणा व इतर वस्तूसाठी बाजारात काही लोक फिरताना दिसत होते.14 दिवसांनंतर आज बाजारपेठ गजबजणार असल्याचे तहसीलदार वैभववाडी रामदास झळके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page