आज संध्याकाळी दिवसा ढवळ्या ५ वाजता गोवेरी भगतवाडी येथील श्रीधर शंकर पालकर यांची सुमारे १०००० किमतीची शेळी वाघिणीने फस्त केल्याने गोवारी भगतवाडी वायंगणी येथे भीतीचे वातावरण पसरले आहे ..शेळीसोबतच इतर जनावरेही तेथे होती .हि घटना समजताच माजी जि .प.अध्यक्ष विकास कुडाळकर ,शिवसेनेचे कार्यकर्ते शोएब खुल्ली ,माजी ग्रा.प.सदस्य सत्यवान हरमळकर यांनी भगतवाडी येथे धाव घेतली व वनखात्याचे शिंदे यांना कळवले .त्यांनी तात्काळ सूर्यकांत सावंत यांना घटनास्थळी पाठवले व वस्तुस्थिती जाणून घेतली . माजी जि .प. अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी पालकर याना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपूरावा करणार असल्याचे सांगत सूर्यकांत सावंत यांना या वाघिणीचा बंदोबस्त करण्यास सांगितले .