कुडाळ तालुक्यात आज नव्याने सापडले एवढे कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज नव्याने सापडले एवढे कोरोना रुग्ण..

कुडाळ तालुक्यात आज सोमवार दि. २३ रोजी दिवसभरात मिळालेल्या माहिती नुसार एकूण ६ कोरोना रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कुडाळ तालुक्यात आज सोमवारी हुमरस येथे ३ व ओरोस येथे ३ असे एकूण ६ कोरोना सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४७७ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या ६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण ११८१ तर बरे झालेले रुग्ण ११२२ आणि सक्रिय रुग्ण २० आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..