कणकवली/-
कणकवली -जाणवली येथील रिगल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष संजयराव शिर्के यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींसाठी खुली काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत कवींनी सहभागी व्हावे असे आवाहन रिगल कॉलेजच्या संचालिका डॉ सुमिता शिर्के यांनी केले आहे.
रिगल कॉलेजचा एकांकिका महोत्सव दरवर्षी होतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांचा सांस्कृतिक विकास महत्त्वाचा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर ही काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या कवीला एक हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, द्वितीय विजेत्या कवीला साडेसातशे रुपये आणि स्मृतिचिन्ह, तृतीय विजेत्या कवीला 500 रुपये आणि स्मृतिचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत पाठविल्या जाणाऱ्या कवितेना विषयाचं आणि शब्दांच बंधन नाही. स्पर्धेसाठी कविता 15 डिसेंबर पर्यंत पुढील पत्यावर पाठविणे आवश्यक आहे. कविता पाठविण्याचा पत्ता महेश परुळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिगल कॉलेज जाणवली. ता. कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग.अधिक माहितीसाठी संपर्क- 9422373717