रत्नागिरी /-
पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली आहे. रुपये २०,०५० कोटी रकमेची ही योजना भारतातील खारे नीमखारे व गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन, त्यामुळे निर्माण होणारे रोजगार व सशक्त अर्थकारण यासाठी दिशादर्शक आहे. योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी सिंधुदुर्ग भाजपाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना केवळ जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक इच्छुक लाभार्थी पर्यंत पोचावी यासाठी विशेष नियोजन केले आहे. त्यासाठीच आज आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण योजनेच्या मत्स्य संपदा योजनेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशन सिंधुदुर्ग आत्मनिर्भर भारत योजनेचे जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी रत्नागिरी कार्यालय येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन आत्मनिर्भर भारतचे जिल्हा संयोजक राजीवजी कीर यांनी केले. आत्मनिर्भर भारत सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अतुलजी काळसेकर यांनी संपूर्ण योजनेची माहिती दिली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या माध्यमातून मच्छिमारांसाठी भरीव तरतूद केली असल्याचे सांगितले, फिशरीज विद्यालयाचे प्रा. मंगेश शिरधनकर सर यांनी योजनेविषयी तांत्रिक माहिती देत लाभार्थ्यास लागेल ते सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दिपकजी पटवर्धन यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राजीव किर यांनी मला दिलेली जबाबदारी भाजपाचे कार्यकर्ते सोबत घेऊन मनापासून पूर्ण करेन व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांना आत्मनिर्भर योजनेचा लाभ मिळवुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपकजी पटवर्धन, सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भर भारत संयोजक अतुलजी काळसेकर, रत्नागिरी(द ) जिल्हा आत्मनिर्भर भारत संयोजक राजीवजी कीर, फिशरीज विद्यालयाचे प्रा. श्री मंगेश शिरधनकर सर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ऐश्वर्याताई जठार, राज्य कार्यकारिणी सदस्य अंजली साळवी,जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत , युवामोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन ,माजी जिल्हाध्यक्ष सचिनजी वहाळकर, मच्छीमार सेलचे अध्यक्ष दामोदर लोकरे , सर्व नगरसेवक , पदाधिकारी , योजना लाभार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राजीव कीर यांनी सर्वांचे आभार मानून केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर चिटणीस निलेश आखाडे यांनी केले.