मालवण /-

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण (बाळु) नाटेकर यांची मालवण आडारी उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाजामध्ये पक्षवाढीकरीता आपण निश्र्चितच प्रयत्न कराल. उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र बाळु नाटेकर यांना देण्यात आले आहे.
यावेळी उपशहरप्रमुख संन्मेश परब, महिला उपजिल्हा आघाडी प्रमुख सेजल परब, महिला तालुका आघाडी प्रमुख श्र्वेता सावंत, महिला तालुका समन्वयक पुनम चव्हाण, महिला प्रभारी तालुका प्रमुख दिपा शिंदे, नगरसेविका तुप्ती मयेकर, सुनिता जाधव, बाळु परुळेकर, पुजा तळाशीलकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, सुरेश मड्ये, पेडणेकर इतर शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page