धुळे येथील पर्यटकाच्या अर्टिका कारला मालवण येथे अपघात..

धुळे येथील पर्यटकाच्या अर्टिका कारला मालवण येथे अपघात..

मालवण-कुपेरीच्या घाटीत कारला झालेल्या अपघातात पर्यटक जखमी…

मालवण /-

मालवणची पर्यटन सफर आटोपून माघारी परतणाऱ्या धुळेच्या पर्यटकांच्या कारला आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मालवण कसाल मार्गावरील कुपेरीची घाटी येथील वळणावर चालकाचा अर्टिका कारवरील ताबा सुटल्याने भिषण अपघात झाला
अपघातात अर्टिका कारमधील प्रवासी कारमध्येच अडकून पडले होते.या मार्गाने जाणाऱ्या वहानातील तसेच स्थानिक ग्रामस्थानी सर्वांना कारमधून बाहेर काढले. जखमीना अधिक उपचारासाठी ओरस जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. अपघाताची तिव्रता पहाता सुदैवानेब जीवीतहानी टळली मात्र अर्टिका कारचे मोठे नुकसान झाले आहे..

अभिप्राय द्या..