कोरोना-लॉक डाऊन कालावधी मध्ये आलेली वाढीव व अवास्तव वीजबिलांबाबत करण्यात आली चर्चा…
कुडाळ /-
कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांची मिटटिंग श्री देव मारुती मंदीर धर्मशाळा येथे पार पडली. त्यावेळी कोरोना – लॉक डाऊन कालावधी मध्ये आलेली वाढीव व अवास्तव वीजबिलांबाबत चर्चा करण्यात आली. सरकारने वाढीव व अवास्तव वीजबिले माफ करावीत. तसेच वीज बिलांवर लावलेले व्याज व स्थिर आकार देखील रद्द करावा. इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे विज बिल मध्ये सवलत देण्यात आली त्याप्रमाणे ती महाराष्ट्रात देखील लागू करावी अशी सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे.कुडाळ तालुक्यातील गावांमध्ये जावून तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या वीज बिल बाबांतच्या समस्या जाणून घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल अशी माहिती कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्री.संजय मुरारी भोगटे व कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी दिली आहे.