मसुरे /-
प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच लाभ घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी यांनी केले आहे.
कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रात पिकांसाठी ऐच्छिक आहे.
कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणा पत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे, म्हणजे संबंधित शेतकऱ्यांना सन 2020-21 या हंगामा करीता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.
फळपिके घेणारे कुळाने,भाडे पट्टीने शेती करणांऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत.
जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यांस फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादीत विमा नोंदणी करण्यासाठी मुभा आहे.
केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण कवच लागू राहणार आहे.आंबा ५ वर्षे व काजू ५ वर्षे वरील याप्रमाणे राहील.
सिंधुदुर्ग जिल्हासाठी एचडीएफसी अँग्रो जनरल इन्शुरन्स कं.लि.हि आहे.
सन २०२०-२१ मध्ये फळपीक निहाय योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत आंबा व काजू करीता ३० नोव्हेंबर २०२० आहे.
आंबा-अवेळी पाऊस,१ डिसेंबर २०२०ते १५ मे २०२१ ब,कमी तापमान,१ जानेवारी २०२१ते १५ मार्च २०२१ क,जास्त तापमान १ मार्च २०२१ ते १५ मे २०२१.काजू – अवेळी पाऊस १डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१,कमी तापमान १डिसेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१,गारपीट १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ याप्रमाणे कालावधी आहे.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी
श्री.व्हि.जी.गोसावी यांनी केले आहे.