मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी धमकीचा निनावी फोन आल्याचे सांगण्यात येत आहे.मुळात शिवसेनेने कॉग्रेस व राष्ट्रवादी सोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे,त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन कॉल असेल,धमकी केव्हा आली असती जर भाजपसोबत सरकार असते तर…त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्या फोनवर बोलायची गरज होती,असा टोला भाजपा प्रदेश सचिव,माजी आ.प्रमोद जठार यांनी लगावला आहे.
मातोश्रीच्या लँडलाइन फोनवर निनावी कॉल आला होता. व्यक्तीने आपण दाऊद गँगकडून बोलतोय असे सांगितले, य मातोश्री बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली नाही. समोरच्या व्यक्तीने त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी सांगितले. त्याअर्थी मुख्यमंत्र्याना शुभेच्छा देण्यासाठीचा हा फोन असावा.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोललं पाहिजे होते.कारण कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे झाले आहेत.त्यामुळे मातोश्री उडवून देण्याचा प्रश्नच नाही.हा सहानुभूती मिळवण्यासाठीच केविलवाणी प्रयत्न असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला.
मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी येणारे फोन कॉल रेकॉर्ड केले जातात.त्यामुळे दाऊद गँगकडून त्या पोलिसांकडे फोन आला,काय बोलणं झालं त्याचं रेकॉर्डिंग जनतेसाठी जाहीर करावे असे खुले आव्हान प्रमोद जठार यांनी दिले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*सिंगल फेज ‘ व थ्री फेज ‘ इंडक्शन मोटर व सबमर्सिम्बल पंपसेट रिवायडींग व रिपेअरी करणारा ३-५ वर्ष पूर्ण अनुभवी व तज्ञ मॅकेनिक पाहिजे.*
*👉पगार : १५ हजार ते २० हजार* ( अनुभवानुसार )प्रत्यक्ष भेटणे
*👉आमचा पत्ता :* श्रीराम बोअरवेल्स, माजगाव रोड, नवीन शिरोडा नाका सावंतवाडी.
*Moba 9420293799 /7774851004*
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
आमचा चैनल👇 *subscribe* करा👇
https://www.youtube.com/channel/UCKUn9TmJQqznaHh_K_B0NQg
____________________________________
*Loksanvad live जाहिरात व बातम्यांकरिता ☎️ 9421235508 / 9404264139*
=============================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page