खा.शरद पवार यांनी सिंधदुर्गाततील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कामाचे केले सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक..

खा.शरद पवार यांनी सिंधदुर्गाततील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक कामाचे केले सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक..

खा.सुप्रियाताई सुळे.ना.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अमित सामंत यांनी दिला जिल्ह्याचा संघटना वर्षपुर्ती अहवाल..

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष
मा.खा.शरदश्चंद्रजी पवार साहेब यांची जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी मुंबई येथे भेट घेऊन जिल्ह्यातील पक्ष संघटना वर्षपुर्ती अहवाल केला सादर.जिल्ह्यात चाललेल्या पक्ष संघटनेच्या कामकाजाची पवार साहेबांनी जाणून घेतली माहिती.सिंधुदूर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत चांगले काम सुरू आहे.असेच काम करत रहा.असे सांगून सुरू असलेल्या संघटनात्मक कार्याचे आनंदाने कौतुक करून जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून असेच काम करत रहा. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील सामान्य घटकांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न करा.सिंधूदूर्ग जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रश्नावर आपले पूर्ण सहकार्य असल्याचे सांगून जिल्ह्य़ातील आघाडीच्या कामकाजाचीही आतुरतेने चौकशी पवार साहेबांनी केली. यावेळी गृहनिर्माण मंञी ना.जितेंद्र आव्हाड खासदार सुप्रियाताई सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभिप्राय द्या..