शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दैवत मानून शिवसैनिक काम करत आहेत… हरी खोबरेकर..

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दैवत मानून शिवसैनिक काम करत आहेत… हरी खोबरेकर..

मालवण शिवसेना शाखेत शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना आदरांजली..

मालवण /

हिंदुत्वावर आणि मराठी माणसावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढण्याच्या इर्षेने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दैवत मानून शिवसैनिक काम करत आहेत, त्यांच्या जाण्याने शिवसैनिकांचा बाप गेला आहे, म्हणूनच बाळासाहेबांसाठी काम करत राहून शिवसैनिकांनी शिवसेनेचा भगवा फडकत ठेवूया, असे प्रतिपादन शिवसेनेचे मालवण तालुकाध्यक्ष आणि जि. प. सदस्य हरी खोबरेकर यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मालवण येथील शिवसेना शाखेत शिवसैनिकांकडून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक नंदू गवंडी यांच्याहस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, उपजिल्हाध्यक्ष शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, रवी तळाशीलकर, उमेश मांजरेकर, किशोर गावकर, हरिशचंद्र केळुसकर, अक्षय भोसले, दत्तात्रय नेरकर, मनोज लुडबे, प्रवीण लुडबे, प्रभाकर मोरे, सुरेश मडये, महिला उपजिल्हा संघटक सौ. परब, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शीरपुटे, दीपा शिंदे, नंदा सारंग, पूजा तळाशीलकर, नीलम शिंदे आदी व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी तरी इथे कार्यकर्त्याची जात, धर्म, पंथ पाहिला जात नाही, कार्यकर्त्यांचे काम बघितले जाते. प्रत्येक कार्यकर्त्याला समाजात ताठ मान करून जगण्याचे बळ बाळासाहेबांनी दिले. शिवसेनेतील प्रत्येकजण शिवसैनिक म्हणून जगत असतो. बाळासाहेबांचे विचार जागृत ठेवून आपणास काम करायचे असून येणाऱ्या नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे, मालवण नगरपालिकेत पुन्हा शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवायचा आहे, असे आवाहन यावेळी हरी खोबरेकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळकर यांनी शिवसेना हा लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे, त्यामुळे एखादे विकास काम न झाल्यास ते न झाल्याबाबत टीका करत न राहता लोकांच्या हितासाठी ते विकासकाम कसे पूर्णत्वास नेता येईल याकडे लक्ष पुरवावे, असे सांगितले. तर नगरसेवक मंदार केणी यांनी आगामी निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी जोमाने काम करून शिवसेनेला तालुक्यातील एक नंबरचा पक्ष बनवूया असे सांगितले. शिंदे यांनीही विचार मांडले.

अभिप्राय द्या..