आता व्हॉट्सॲपववरून बिनधास्त करा घरबसल्या शॉपिंग.;जणून घ्या..

आता व्हॉट्सॲपववरून बिनधास्त करा घरबसल्या शॉपिंग.;जणून घ्या..

ब्युरो न्यूज /-

आता व्हॉट्सॲपवरून बिनधास्त करा घरबसल्या शॉपिंग इस्टंट मेसेजिंग ॲपने नवीन फीचर रोलआऊट केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲपवर (whatsapp) बिझनेसही (business) करू शकता.
मुंबई: इस्टंट मेसेजिंग ॲप्लिकेशन WhatsAppने आपले नवीन फीचर रोलआऊट केले आहे. हे व्हॉट्सॲप बिझनेस नावाने ओळखले जाते. याच्या मदतीने युजर्सला सामानाची खरेदी चॅटिंगच्या माध्यमातून करता येण्याची सोय उपलब्ध झाली आहे.. यासाठी युजर्सला सोप्या चॅटिंगची मदत घ्यावी लागणार आहे. यासोबतच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तुम्हाला प्रोडक्टची संपूर्ण माहितीही मिळवता येणार आहे.

रिपोर्टनुसार नव्या WhatsAppच्या फीचरच्या माध्यमातून सर्व व्हॉट्सॲप बिझनेस अकाऊंट युजर्सना सरळ आपल्या ग्राहकांना प्रॉडक्टचा कॅटलॉग देण्याची सुविधा आहे.

यासाठी WhatsAppवर शापिंगचे एक बटन जोडले जाणार आहे. WhatsAppच्या या शॉपिंग बटनामध्ये युजर्सला आपले प्रॉडक्ट ॲड करावे लागतील आणि ते थेट कस्टमरच्या डिस्प्लेवर दिसणार आहेत. हे तुम्ही व्हॉट्सॲप च्या चॅटद्वारे करू शकता. WhatsAppचे हे नवे फीचर भारतातील छोटया छोट्या व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.

WhatsAppकडून काहीच दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली की, कंपनी WhatsApp business app साठी काही चार्ज बिझनेसमनकडून घेऊ शकते. दरम्यान, facebook कडून अद्याप घोषणा झालेली नाही. याचाच अर्थ बिझनेसमनला काही सर्व्हिससाठी पैसे द्यावे लागतील. तर कस्टमरसाठी हे ॲप फ्री असेल.
हे सुद्धा वाचा

व्हॉट्सॲपववरून पाठवता येणार पैसे
व्हॉट्सॲपच्या आतापर्यंत आपण मेसेजेस(messages) पाठवू शकत होतो.मात्र आता तुम्ही याद्वारे पैसेही पाठवू शकता. मेसेजिंग ॲपच्या माहितीनुसार लोक सुरक्षित पद्धतीने कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पैसे पाठवू शकतात.तसेच रोख व्यवहार करण्यासाठी किंवा स्थानिक बँकेत न जाता दूर राहूनही वस्तुंच्या किंमती शेअर करू शकतात.

अभिप्राय द्या..