नवी दिल्ली /-

भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित व्यहारांचे प्रमाण वाढले आहे. फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएमसारख्या (Paytm) युपीआय आधारित अॅप्सचा देशात मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना टक्कर देण्यासाठी आता व्हॉट्सअॅप मैदानात उतरलं आहे. व्हॉट्सअॅपवरुन (Whatsapp) आता पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणं शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार WhatsApp Pay हे फिचर नुकतंच भारतात रोलआऊट करण्यात आलं आहे.

युजर्स आता व्हॉट्सअॅपद्वारे UPI चा वापर करु शकतात. हे अॅपही इतर पेमेंट्स अॅपप्रमाणेच आहे. भारतात WhatsApp Pay चा वापर करायचा असल्यास तुमच्याकडे बँक अकाऊंट आणि त्या बँकेचं डेबिट कार्ड असणं गरजेचं आहे. याद्वारे तुम्ही WhatsApp Pay चा वापर करु शकाल. व्हॉट्सअॅपच्या पेमेंट्स फिचरचा वापर करण्यापूर्वी या सहा महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक युजरने लक्षात ठेवायला हव्यात.
1★ WhatsApp तुम्हाला पेमेंट्स अॅप अॅक्टिव्हेट करण्यासाठी कोणताही कॉल किंवा मेसेज करणार नाही. WhatsApp Pay सुरु होताच सायबर क्राईम वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला WhatsApp च्या नावाने कोणताही कॉल आला तर तो फेक कॉल आहे, हे समजून जा.
2★ WhatsApp ची कोणतीही कस्टमर केअर सर्व्हिस नाही. त्यामुळे कोणत्याही माहितीसाठी तुम्ही WhatsApp कस्टमर केअरचा नंबर शोधण्याचा प्रयत्न कराल आणि स्वतःचं नुकसान करुन घ्याल.
3★ कार्ड डिटेल्स आणि ओटीपी शेअर करु नका : तुम्ही जर कोणत्याही व्यक्तीसोबत तुमच्या कार्डची माहिती आणि ओटीपी शेअर केली तर तुमचं अकाऊंट रिकामं होऊ शकतं. त्यामुळे ही माहिती कोणाशीही शेअर करु नका.
4★ WhatsApp वर कोणत्याही फालतू लिंकवर क्लिक करु नका, समजा तुम्ही तसं केलंच तर तिथे विचारलेली माहिती देऊ नका. प्रामुख्याने तुमच्या बँक अकाऊंटशी संबंधित माहिती शेअर करु नका.
5★ केवळ तुमच्या ओळखीच्या लोकांकडून आलेल्या पेमेंट्स रिक्वेस्ट स्वीकारा. एखादी व्यक्ती तुमच्या व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्टमध्ये नसेल तर त्या व्यक्तीची पेमेंट्स रिक्वेस्ट स्वीकारु नका.
6★ पेमेंट करताना आणि केल्यानंतर पुन्हा एकदा तपासून पाहा की, तुम्ही योग्य व्यक्तीलाच पेमेंट करत आहात का? अनेकदा चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पेमेंट केलं जातं. त्यामुळे कोणतीही घाई न करता तपासूनच पेमेंट्स करा. तसेच पेमेंट करण्यापूर्वी त्या व्यक्तीला मेसेज करुन पाहणं हा योग्य उपाय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page