सिंधुदुर्गनगरी /-

डेगवे आडाळी येथील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी दिडशे ते दोनशे कोटी रुपये खर्च करून करण्यात येणाऱ्या योजनेच्या पाईपलाईनला वेडीवाकडी वळणे देत, रस्त्यात जागोजागी चर मारल्याने दोडामार्ग-बांदा रस्त्यावर अनेक अपघात घडत आहेत. या कामाबाबत आंदोलने करूनही दखल घेतली जात नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून सासोली, डेगवे परिसरातील गावांना पाणी देण्याऐवजी एमजीपी आणि ठेकेदार संगनमताने काम करण्यासाठी ती योजना घेतल्याचा आरोप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केला..येत्या दोन दिवसात याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही जलव्यवस्थापन समिती बैठकीत दिला आहे.

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष तथा समिती सभापती समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, बांधकाम वित्त सभापती बाळा जठार, शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव राजेंद्र पराडकर,।सदस्य श्वेता कोरगावकर, संजना सावंत आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.

शासनाने कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सभा घ्याव्यात असे आदेश दिले परंतु आता कोरोना ओसरला, पालकमंत्री थेट जनता दरबार घेतात, दिशा समितीसारख्या सभा खासदारांच्या उपस्थितीत होतात, मग जिल्हा परिषदेच्या विषय समिती सर्वसाधारण सभा ऑनलाईन का असा संतप्त सवाल सदस्यांनी करत याबाबत शासनाकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत कळवूनही शासन दखल घेत नसेल तर यापुढील सर्व सभा आम्ही ऑफलाईन घेणार, आमच्यावर कोणती ती कारवाई करा, असा सवाल केला. तसेच अशा ऑनलाईन सभा यापुढे लावू नये असा ठराव जलव्यवस्थापन समिती बैठकीत घेण्यात आला .

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी डेगवे, सासोली गावांसाठी जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून होणारे दिड-दोन कोटीची योजना काम सुरू आहे. यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईप रस्त्यातील वेडीवाकडी वळणे पकडत टाकल्यामुळे दोडामार्ग-बांदा रस्त्याची वाट लागली आहे जागोजागी अपघात घडत आहेत याला जबाबदार कोण ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page