सावंतवाडी /-

शहर भाजप मंडलच्यावतीने दिवाळीनिमित्त नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा मोती तलावाकाठी आयोजित न करता सावंतवाडीतील प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन सहभागी नरकासुराचे परीक्षण केले जाणार आहे. ही स्पर्धा लहान आणि मोठा अशा दोन गटात आयोजित करण्यात आली असून, विजेत्यांना आकर्षक असे पारितोषिक देखील ठेवण्यात आले आहे.

मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक ३५००, द्वितीय पारितोषिक २००० तर तृतीय पारितोषिक १५०० आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. तर लहान गटासाठी प्रथम पारितोषिक १५०० आणि द्वितीय पारितोषिक १००० रुपये ठेवण्यात आले आहे

. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नगरसेवक आनंद नेवगी ९४२२६३३३५७, शहर भाजप प्रवक्ते केतन आजगावकर ९५२२०५४८५१, युवा कार्यकर्ते विनोद सावंत ९४०५८२७६९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भाजप मंडल शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page